भोसरीत योग प्रात्यक्षिके

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
भोसरीत योग प्रात्यक्षिके

सांगवी : भोसरी येथील गंगोत्री पार्क परिसरात जिजाऊ प्रतिष्ठानच्या महिलांनी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा केला. या वेळी महिलांनी विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर करून योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते, असा संदेश देण्यात आला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला. परिसरात आरोग्यदायी जीवनशैलीचा जागर जागर संदेश पोहोचविण्यात आला.