पाण्याच्या टँकरनेच केला घात

महाराष्ट्र टाइम्स
death of two bikers in the collision with a speeding water tanker

हडपसरमधील टँकर अपघाताची घटना ताजी असतानाच वाघोलीतही भरधाव कारच्या धडकेत आणखी एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. केसनंद रस्त्यावर शनिवारी (२० जून) दुपारी पावणेबाराच्या सुमारास झालेल्या अपघातात संदीप मनोजभाई पटेल (वय ३९, रा. न्याती सोसायटी, वाघोली) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार झालेल्या चालकाचा शोध सुरू आहे.

शहरात पाण्याच्या टंचाईमुळे टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ नागरिकांवर आली असताना, दुसरीकडे पाण्याच्या टँकरने निष्पाप महिलेचा जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना हडपसरमध्ये घडली.

भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीवरील नेहा सुमीत उपाध्ये (वय २७) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे पती सुमीत उपाध्ये गंभीर जखमी झाले आहेत.

शनिवारी (२० जून) दुपारी सव्वाचारच्या सुमारास सुमीत आणि नेहा सय्यदनगर येथील रेल्वे भुयारी मार्गातून सातवनगरकडे दुचाकीवरून जात होते. त्या वेळी मागून आलेल्या पाण्याच्या भरधाव टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडकेमुळे नेहा रस्त्यावर कोसळल्या आणि टँकरच्या चाकाखाली आल्याने नेहा यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघातात सुमीत उपाध्ये गंभीर जखमी झाले. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी टँकरचालक रामेश्वर देवीदास यमगिर (वय ३२) याला अटक केली असून, सुमीत उपाध्ये यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीषा निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट दिली.