पुणे : पावसाची प्रतीक्षा संपून शहरात रविवारी सायंकाळच्या सुमारास कोसळलेल्या पावसाच्या जोरदार सरींमुळे पुणेकर सुखावले. रविवारी घराबाहेर पडलेल्यांची या अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे चांगलीच धांदल उडाली.
येत्या २४ ते ४८ तासांत नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मान्सून) अधिकृतपणे पुण्यात दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
रविवारी सायंकाळी खरेदीसाठी घराबाहेर पडलेल्यांची तारांबळ उडाली. हवामान विभागाने पुढील काही दिवस शहर आणि परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तविली आहे.
संबंधित वृत्त... प्लस १










