भीषण अपघातातबाप-लेक ठार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
horrific accident in junner claims father and daughter tragic death

जुन्नर : अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील ढमालेमळा फाटा परिसरात टेम्पो आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार आणि त्याची तीन वर्षांची मुलगी यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांची पत्नी, दुसरी मुलगी आणि मेहुणा गंभीर जखमी झाले. यात अजय बबन दुधवडे (वय २१) आणि त्यांची मुलगी अनुजा अजय दुधवडे (वय ३, दोघे रा. माळवंदवाडी, मु. पो. घारगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. सलोनी अजय दुधवडे (वय १९), तनुजा अजय दुधवडे (वय ५) आणि सुदर्शन गौतम केदार (वय २०, रा. पांगरीमाथा, ता. जुन्नर) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 उर्वरित वृत्त... ४

जयस्वालला वगळले

मुंबई : गेल्या शनिवारीच अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद ११० धावांची खेळी करूनही मुंबईकर यशस्वी जयस्वाल याला इंग्लंड दौऱ्यावरील आगामी वन-डे क्रिकेट मालिकेच्या भारतीय संघातून वगळण्यात आले. आगामी इंग्लंड दौऱ्यावरील तीन सामन्यांच्या वन-डे क्रिकेट मालिकेसाठी रविवारी भारतीय संघाची निवड करण्यात आली.

 वृत्त... ९