नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) विठ्ठलवाडी येथे विश्रांतीनगर (कै. प्रकाश इनामदार चौक) येथे महापालिकेची आरोग्याची कोठी आहे. त्या ठिकाणी नामकरण न झालेला दवाखानाही नागरिकांच्या सोयीसाठी सुरू केला आहे. दवाखान्यात ज्येष्ठ नागरिक (स्त्री-पुरूष) येतात. दवाखाना चांगला असून, उद्वाहनाची ( लिफ्ट ) सोय करण्यात आली आहे. मात्र, लिफ्ट अद्याप सुरू केलेली नाही. त्यामुळे तातडीने दवाखान्यातील लिफ्ट सुरू करून नागरिकांची सोय करावी.
- सुहास मुंगळे, विठ्ठलवाडी










