नांदेड गुरुद्वारासाठीनवीन कायदा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
nanded gurudwara reform new law to enhance efficiency

मुंबई : नांदेड येथील जगप्रसिद्ध ‘द नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अपचलनगर साहिब’चा कारभार आता काळाच्या ओघात अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे. या गुरुद्वारासाठी तब्बल ७० वर्षांपूर्वी म्हणजेच १९५६ मध्ये करण्यात आलेला कायदा रद्द करून, त्याऐवजी संपूर्ण नवीन कायदा लागू करण्याचा निर्णय रविवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

निर्णयाविषयी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले, ‘नांदेडच्या या गुरुद्वारामध्ये देश-विदेशातून येणाऱ्या दर्शनार्थींच्या संख्येत गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे; तसेच प्रशासकीय कामकाजाची व्याप्तीही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, १९५६ च्या कायद्यातील अनेक तरतुदी आता कालबाह्य झाल्याचे समोर आले होेते.’