‘मी उद्धव ठाकरेंसोबतच’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
rajul patils firm determination to stand by uddhav thackeray

मुंबई : ‘एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’मध्ये गळाला लागलेले ईशान्य मुंबईतील शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय पाटील यांची कन्या आणि नगरसेविका राजुल पाटील यांनी रविवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. ‘माझी आणि माझ्या वडिलांची भविष्यातील राजकीय वाट वेगवेगळी आहे,’ असे राजूल यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले.

‘मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटायला आले होते. मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. मी पक्षातच आहे. मी माझे कार्य निष्ठेने करेन. उद्धव ठाकरे यांचा आज आमच्या मतदारसंघात दौरा असून, मी त्यांचे स्वागत करणार आहे. मी माझे म्हणणे मांडले, उद्धव ठाकरे आनंदी आहेत,’ असे राजुल यांनी सांगितले.