परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना नीट आणि जेईई फाऊंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी विशेष योग व प्राणायाम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रा. किरण सोनटक्के होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सचिव प्रा. शितल सोनटक्के व योगाचार्य संतोष दडके उपस्थित होते..










