छत्रपती संभाजीनगर : दुग्धविकासमंत्री अतुल सावे यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, विवेक देशपांडे, उत्तम काळवणे, संजय औरंगाबादकर, कैलास जाधव, आनंद अग्रवाल, माधुरी अदवंत, विश्वनाथ स्वामी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहते; तसेच निरोगी जीवनशैली अंगीकारण्यास मदत होते, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. योगासनाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
परभणीत सामूहिक योगासने
परभणी : परभणी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन, शिक्षण व क्रीडा विभाग, मनपा, मेरा युवा भारत आणि जागतिक योग उत्सव समिती यांच्यातर्फे रविवारी जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अप्पर पोलिस अधीक्षक तानाजी चिखले आणि जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे उपस्थित होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी नियमित योगाभ्यासाचे आवाहन केले.
सावित्रीबाई फुले मुलींचे हायस्कूल, मराठवाडा हायस्कूल, बालविद्या मंदिर आणि गांधी विद्यालय या शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले. जिल्हा योग परिषदेतर्फे स्पर्धा घेण्यात आल्या. सुभाषराव जावळे, सचिव कृष्णा कवडी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सुभाषराव जावळे यांनी, सूत्रसंचालन सपना कारेगावकर यांनी, तर आभार प्रदर्शन कृष्णा कवडी यांनी केले.










