नाशिक : सिन्नर पोलिसांत दाखल गुन्ह्यांत भोंदूबाबा संशयित अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला नाशिकरोड न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. एक लाख रुपयांसह तितक्याच रकमेचा जामीनदार असण्याबाबत आदेश देत तपासात सहकार्य करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
सविस्तर वृत्त...३धर्मांतरासाठी प्रलोभन
मनमाड : नांदगाव येथे एका तरुणाला धर्मांतरासाठी धमक्या दिल्याप्रकरणी सहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओम नीलेश काळे (वय १८, रा. नांदगाव) याने याबाबत तक्रार दिली असून, धर्मांतरास नकार दिल्यानंतर माझ्यासह कुटुंबाला धमक्या दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
सविस्तर वृत्त...९
व्हिडीओवरून वादंग
चंडीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या कथित व्हिडीओवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात मान यांना ‘अकाल तख्त’ने आधीच दोषी ठरवले असताना न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या बनावट अहवालासाठी आम आदमी पक्ष आणि मान यांनी कट रचल्याचा आरोप भाजपने केला. आपल्या बदनामीसाठी विरोधी पक्षांनी हातमिळवणी केल्याचा दावा मान यांनी केला.
‘कॉक्रोच’ला पाठिंबा
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला देशातील खाप पंचायतींचा पाठिंबा मिळाला आहे. येत्या रविवारी विविध खाप पंचायतींचे प्रतिनिधी आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती अभिजीत दीपके यांनी बुधवारी दिली.
सविस्तर वृत्त...१२
दरेकर-कडू चकमक
मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर आणि शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार बच्चू कडू यांच्यात शा ब्दिक वाद झाला. माझ्या प्रश्नांची उत्तरे सहकारमंत्री देतील, अशी टीका कडू यांनी केली. मात्र, मंत्र्यांचे बोलणे थांबविणे योग्य नसल्याचे दरेकर म्हणाले. यावर कडू यांच्या आवाजाचा पारा चढला असता दरेकर यांनी, तुमच्यापेक्षा दहा पट जास्त आवाज चढवू शकतो, असे प्रत्युत्तर दिले. अखेर, सभापती राम शिंदे यांनी मध्यस्थी करत दोघांनाही शांतता राखण्याचा सल्ला दिला.