‘हायड्रेशन ब्रेक’चा संघांना जास्त फायदा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
‘हायड्रेशन ब्रेक’चा संघांना जास्त फायदा
वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेत ‘ हायड्रेशन ब्रेक ’वर टीका होत आहे. मात्र, याचा संघांना जास्त फायदा झाला आहे. त्यामुळे भविष्यातही तो कायम ठेवण्याबाबत विचार होईल, असे जागतिक फुटबॉल महासंघ अर्थात फिफाचे अध्यक्ष गिआनी इन्फँटिनो यांनी सांगून जणू नव्या वादास तोंड फोडले आहे.

‘हायड्रेशन ब्रेक’ हा व्यावसायिक फायद्यासाठी आहे. त्यामुळे खेळाची लय जाते, अशी टीका होत आहे. मात्र, इन्फँटिनो यांना हे मान्य नाही. ‘या ब्रेकच्या वेळी मार्गदर्शक सामन्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करून सूचना करीत आहेत. खेळाडूही ताजेतवाने होत आहेत. त्यानंतर जास्त जोशात खेळत होत आहे. एकंदरीत चांगलेच दिसत आहे. सामनेही बघा. आता पूर्ण ९० मिनिटे खेळाडू प्रयत्नांची शर्थ करीत आहेत,’ असे समर्थन इन्फँटिनो यांनी केले.