विकेटची चिंता सोडून कर्णधार हरमनप्रीत कौर हिने तिच्या नैसर्गिक आक्रमक शैलीवर लक्ष केंद्रित करावे, असे सूचक उद्गार भारतीय संघाची वेगवान गोलंदाज शिखा पांडे हिने काढले. सलामीच्या फलंदाजांनी केलेल्या आक्रमक सुरुवातीला न्याय देत वेगवान धावा करण्याची जबाबदारी हाताळण्यात हरमनप्रीत कमी पडत आहे.