अधिकाऱ्यांना मुदतवाढीचा ‘कुंभ’

Contributed byनाशिक|महाराष्ट्र टाइम्स
अधिकाऱ्यांना मुदतवाढीचा ‘कुंभ’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)
राज्य गृह विभागाच्या आदेशानुसार सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरासह ग्रामीण पोलिस दलातील चार पोलिस अधिकाऱ्यांना बदल्यांसाठी एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे, तर नाशिक शहरातील अडीचशेपेक्षा जास्त अंमलदार आणि साठपेक्षा जास्त अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्तांनी वर्षभरासाठी मुदतवाढीचे ‘बक्षीस’ दिले आहे. नाशिकबाहेरीलही अनेक अधिकाऱ्यांना मुदतवाढ मिळाली असली तरी इतर विभागांतून नाशिकमध्ये अनेकांची नियुक्ती झाली आहे.

राज्य गृह विभागाने सहाय्यक पोलिस आयुक्त तथा उपअधीक्षक पदावरील दीडशेपेक्षा जास्त अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यासह २२४ निरीक्षकांना सहाय्यक आयुक्त, उपअधीक्षक पदी बढती देण्यात आली. त्यामध्ये शहरातील अधिकाऱ्यांची फौज अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे, तर काही दिवसांपासून सुरू असलेल्या बदल्यांमध्ये पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बऱ्याच अधिकारी- कर्मचाऱ्यांना पोलिस ठाण्यांसह संबंधित विभागात वर्षभरासाठी मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग येथून निरीक्षक दिलीप पिठे यांची महाराष्ट्र पोलिस अकादमीत उपअधीक्षक पदी बदली झाली आहे. बुलढाण्यातून पंडित सोनवणे यांची नाशिक नागरी हक्क संरक्षण विभागात उपअधीक्षक पदी बदली झाली आहे. दिलीप ठाकूर, सीमा परिहार यांना उपअधीक्षक पदी बढती मिळाली आहे.
अधिकाऱ्यांना मुदतवाढीचा ‘कुंभ’