ब्रिटिशकालीन पाइपलाइनची चोरी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
theft of british era pipeline in arvi city use of cctv footage
वर्धा : आर्वी शहरातील सारंगपुरी तलावापासून टाकण्यात आलेली ब्रिटीशकालीन धातूची पाइपलाइन चोरीला गेल्याची बाब समोर आली आहे. या पाइपलाइनची चोरी झाल्याचा पुरावा म्हणून सीसीटीव्ही फुटेजच राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

आर्वी शहरातील सारंगपुरी तलाव हा जुना तलाव आहे. या तलावातून आर्वी शहराला पूर्वी पाणीपुरवठा होत होता. येथे असलेली जुनी पाइपलाइन ही तांबे, पितळ, कांस्य व बीड अशा विविध धातूपासून बनलेली होती.