नागपूर : ड्रिल मशिनद्वारे भिंतीला छिद्र करताना विजेचा धक्का बसल्याने युवकाचा मृत्यू झाला. विकास जागेश्वर चव्हाण (वय २४, रा. नवकन्यानगर, भरतवाडा रोड, कळमना) असे मृताचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सोमवारी रात्री विकास हा सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वर्धा मार्गावरील किया कार शोरूमवरील भूमेश पेशने यांच्या नवीन कार्यालयात विकास काम करीत होता. काम करताना तो ड्रिल मशिनद्वारे भिंतीला छिद्र पाडत होता. याचदरम्यान विजेचा धक्का बसल्याने तो बेशुद्ध झाला. त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.