‘हॅपी स्ट्रीट’मध्ये आज होणार धमाल

महाराष्ट्र टाइम्स

Nagpur's beloved Happy Street event is back today. From 6 AM to 9 AM, Law College Chowk to Laxmibhuvan Marg will be alive with activity. Citizens can enjoy traditional games and Zumba dance. This initiative by Maharashtra Times and The Times of India promises a fun-filled morning for families.

dhamal at happy street today 15 games zumba dance and health awareness for nagpur residents

नागपूर : पारंपरिक खेळ, झुम्बा डान्स आणि कुटुंबीयांसोबत धमाल करण्याची संधी देणारा ‘हॅपी स्ट्रीट’ हा नागपूरकरांचा आवडता उपक्रम आज, रविवारी पुन्हा आला आहे. सकाळी ६ ते ९ या वेळेत लॉ कॉलेज चौक ते लक्ष्मीभुवन मार्ग यासाठी सज्ज झाला आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’ आणि ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या या उपक्रमात नागपूरकरांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून महापौर नीता ठाकरे आणि उपमहापौर लीला हाथीबेड उपस्थित राहतील. या उपक्रमात आरोग्यविषयक जनजागृतीसाठी हेल्थ पार्टनर एचसीजी कॅन्सर सेंटर, नागपूर असून पॉवर्ड बाय रायसोनी एज्युकेशन आहे. असोसिएट पार्टनर एसबीएल एनर्जी लिमिटेड आहे. दिल्ली पब्लिक स्कूल, स्कायलिंक आणि दिशाज हेअर अँड ब्युटी यांचे सहकार्य आहे. बेव्हरेज पार्टनर नो कंट्रोल, लिजर पार्टनर रोमिओ लेन आणि डिजिटल पार्टनर तेज टेक आहेत. नागरिकांसाठी किमान बजेटमध्ये खेळता येतील, असे १५ खेळ ठेवण्यात आले आहेत.