गुणधर रॉय यांचे नातेवाइक उत्तम यांनी काही महिन्यांपूर्वी कामाच्या निमित्ताने गुणधरला मुंबईला बोलावून घेतले होते. गुणधर कुटुंबाचा कमावता आधार आहे. कामाच्या ठिकाणी कंत्राटदाराकडून सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारची साधने देण्यात आली नव्हती, असे त्याने सांगितले. गुणधरची प्रकृती गंभीर असून, त्याच्या कुटुंबीयांना ही माहिती कळली तर त्यांची अवस्था काय होईल, याचा विचारही करवत नाही, असे उत्तम यांनी सांगितले.







