‘इंदिरा स्कूल’चे ८४ विद्यार्थी दुबईत अडकले

महाराष्ट्र टाइम्स

A group of 84 MBA students from Indira School of Business Studies in Pimpri-Chinchwad are stranded in Dubai. They were in the UAE for a Global Innovation Program. The ongoing conflict between Iran and Dubai has led to the cancellation of their return flights. The students are currently in a safe location. The college is in constant contact with them.

84 indira school mba students stranded in dubai after iran attack return flights canceled college covering expenses

पुणे : दुबई येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील दहा जणांचा ग्रुप सध्या दुबईतच अडकून पडला आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांची स्पाइसजेटची परतीची फ्लाइट अचानक रद्द करण्यात आली. पर्यायी व्यवस्था अद्याप नसल्याने ते मोठ्या अडचणीत सापडले आहेत. दहा जणांचा ग्रुप २३ फेब्रुवारीला पुण्यातून दुबईला गेला होता. २८ फेब्रुवारीला त्यांचा परतीचा प्रवास नियोजित होता. मात्र, हवाई सेवा विस्कळीत झाल्याने त्यांची फ्लाइट रद्द करण्यात आली. त्यानंतर एक मार्चची फ्लाइटही रद्द झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली. अडकलेल्या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, विमान कंपनीकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. निवास व अन्नाची सोय स्वतःच्या खर्चाने करावी लागत आहे. ‘परतीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे; मात्र विमानसेवा पूर्ववत होण्यास किती वेळ लागेल, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. परदेशात दीर्घकाळ राहणे आर्थिकदृष्ट्या कठीण जात आहे,’ अशी भावना सिद्धेश जाधव या तरुणाने व्यक्त केली. सिद्धेशसोबत चेतन देविदास सोहनी, सिद्धेश्वर धनराज जाधव, प्रविण मच्छिंद्र भांड, विशाल भारत भोसले, अजय चंद्रशेखर काळे, रोहित हरी आल्हाट, गणेश सूर्यकांत गुळवे, प्रकाश सिद्धाराम गवळी, किशोर किसनराव कुलकर्णी आणि संदीप अशोक उकरंडे, हे त्याचे मित्र आहेत.

इराण आणि दुबईतील युद्धजन्य परिस्थितीचा फटका पिंपरी-चिंचवडमधील ‘इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज’मध्ये एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या ८४ विद्यार्थ्यांना बसला आहे. दरवर्षीप्रमाणे हे विद्यार्थी दुबईमध्ये ‘ग्लोबल इनोव्हेशन प्रोग्राम’साठी गेले होते. मात्र, दुबईवर इराणने हल्ला केल्यामुळे हे विद्यार्थी दुबईमध्येच अडकून पडले आहे. दरम्यान, कॉलेजकडून या विद्यार्थ्यांनी सातत्याने संपर्क साधला जात असून हे विद्यार्थी सुरक्षित आहेत. दुबईतील विमानसेवा सुरू झाल्यानंतर त्यांना भारतात आणले जाणार आहे.

वाकड येथिल ‘इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज’चे ८४ विद्यार्थी २३ फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते. हे विद्यार्थी एमबीएच्या पहिल्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून संस्थेकडून एमबीएच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना दुबईमध्ये ‘ग्लोबल इनोव्हेशन प्रोग्राम’साठी पाठविले जाते.

या वर्षी एकूण १ हजार ८० विद्यार्थी हा प्रोग्राम करणार आहे. त्यापैकी आतापर्यंत ६०० विद्यार्थी हा प्रोग्राम करून आले आहे. तर ८४ विद्यार्थ्यांची एक तुकडी सध्या दुबईत आहे. २३ फेब्रुवारीला ही तुकडी दुबई येथे गेली होती. मात्र, शनिवारी इराणने दुबईवर हल्ला केल्याने या विद्यार्थ्यांचे परतीचे विमान रद्द झाले. इराणच्या हल्ल्यामुळे दुबईतील परस्थिती बदलली आहे. विमानतळाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस तेथिल विमान सेवा सुरु होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

विमानसेवा सुरू होताच त्यांना भारतात आणले जाणार आहे, असे ‘इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीज’च्या प्रशासनाने कळवले आहे. आम्ही हॉटेलमध्ये असून सुरक्षित असून आमचा सर्व खर्च कॉलेज करत आहे. लवकरच आम्ही येथून सुरक्षितपणे भारतात परतणार असल्याचे दुबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांने व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. दुबईमध्ये अडकलेल्या ८४ विद्यार्थ्यांपैकी ५५ मुले तर २९ मुली आहेत.