रस्ते खोदणाऱ्यावर गुन्हा दाखल

महाराष्ट्र टाइम्स

A case has been registered against a private gas supplier and contractor in Pune. They dug up roads without prior permission. This caused a massive traffic jam near Sant Dnyaneshwar Paduka Chowk. Students and parents were affected during board exams. Traffic police managed the situation. Legal action is being taken against the company and contractor.

case registered against officials of a private gas supply company for road digging without permit

पुणे : कोणतीही पूर्वसूचना न देता रस्तेखोदाई करणाऱ्या खासगी गॅसपुरवठादार कंपनीचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रस्तेखोदाईमुळे शिवाजीनगर परिसरातील संत ज्ञानेश्वर पादुका चौक परिसरात शुक्रवारी सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. त्याचवेळी दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्याकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळित झाली. माहिती मिळताच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तात्पुरते नियोजन करून परिस्थिती आटोक्यात आणली. मात्र, सकाळच्या गर्दीच्या वेळी नागरिकांना बराच वेळ कोंडीत अडकून राहावे लागले.

रस्तेखोदाईपूर्वी वाहतूक विभागाची परवानगी घेतली नसल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित कंपनी व ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.