जगभरातून शांततेचे आवाहन

महाराष्ट्र टाइम्स

West Asia faces a wider war threat after US and Israel attacked Iran. World leaders urge an immediate halt to violence and a return to talks. Some nations back the US actions, while others criticize them. The United Arab Emirates advised Iran to act responsibly. The Arab League condemned the attacks as violations of sovereignty.

जगभरातून शांततेचे आवाहन

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात महायुद्धाचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, हा हिंसाचार तातडीने थांबवून चर्चेच्या मेजावर परतण्याचे आवाहन जगभरातील नेत्यांनी केले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनीचे चॅन्सलर फ्रीड्रिच मर्झ यांनी संयुक्त निवेदन जारी केले आहे. ‘स्वतःचे भान राखा. जगापासून अलिप्त होण्यापूर्वी आणि परिस्थिती अधिक बिघडण्यापूर्वी आपल्या शेजाऱ्यांशी संयमाने आणि जबाबदारीने वागा,’ असे संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) सल्लागार अन्वर गरगाश यांनी इराणला उद्देशून म्हटले आहे. याशिवाय २२ देशांच्या ‘अरब लीग’ने इराणच्या हल्ल्यांना शांतताप्रिय देशांच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन म्हटले आहे.

या संघर्षावरून जगात दोन गट पडल्याचे चित्र आहे. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडाने अमेरिकेच्या कारवाईला उघड पाठिंबा दिला आहे, तर रशिया आणि चीनने या हल्ल्यांवर कडक शब्दांत टीका केली आहे.