नवज्ञात ग्लिमफॅटिक संस्था

महाराष्ट्र टाइम्स

A newly understood system called the Glymphatic system clears waste from the brain. This process is most active when we sleep. Cerebrospinal fluid plays a key role in this waste removal. Scientists have learned more about this function in recent years. Understanding this system helps us grasp brain health better.

नवज्ञात ग्लिमफॅटिक संस्था

पल्या मेंदूतील पोकळ्यांत आणि मेंदूभोवतालच्या आवरणांत पाण्यासारखा पारदर्शक द्रव असतो. तो चेतारज्जूमध्यातील पोकळीत आणि चेतारज्जूच्या आवरणांतदेखील असतो. त्याला मराठीत मेंदू-चेतारज्जूद्रव आणि इंग्रजीत सेरेब्रोस्पायनल फ्लुइड - सीएसएफ म्हणतात.

सीएसएफ मेंदूतील पोकळ्यांच्या अस्तरातील सूक्ष्म रक्तवाहिन्या, म्हणजे केशवाहिन्यांतून झिरपतो आणि अभिसरणानंतर रक्तातच मिसळतो. सीएसएफ जेमतेम एक कप म्हणजे दीडशे मिलीलीटर एवढाच असला, तरी फार महत्त्वाची कामे करतो. तो मेंदू-चेतारज्जूपृष्ठावर सर्व बाजूंनी एकसारखा दाब ठेवून सीएसएफ यांत्रिक धक्क्यांपासून मेंदूचे आणि चेतारज्जूचे रक्षण करतो. तो मेंदू-चेतारज्जूपेशींना आवश्यक पोषण, ऑक्सिजन आणि संप्रेरके पोहोचवतो. मेंदू-चेतारज्जूच्या पेशींनी निर्माण केलेले उत्सर्ग दूर उत्सर्जक संस्थेपर्यंत सीएसएफच नेतो. या यादीतील उत्सर्गवहनाच्या कामाबद्दल, फारशी माहिती नव्हती. ती २०१२पासून हळूहळू उजेडात येत आहे. ग्लिमफॅटिक (Glymphatic) सिस्टिम, ही मेंदूतील टाकाऊ पदार्थ बाहेर काढते. ती प्रामुख्याने आपण झोपेत असतो, तेव्हा सक्रिय असते. ग्लिमफॅटिक हा नवा शब्द २०१२मध्ये मायकेन नीरगार या डॅनिश चेताशास्त्रज्ञाने वापरात आणला. लिम्फॅटिक्स (रसवाहिन्या) शब्दाआधी इंग्रजी ‘जी’ अक्षर जोडून त्याने ग्लिमफॅटिक ही संज्ञा बनवली. ग्लिमफॅटिकमधील ‘जी’ हे इंग्रजी आद्याक्षर ग्लिया पेशींबद्दल आहे. त्या आवेग निर्माण करणाऱ्या, संदेशवहन करणाऱ्या चेतापेशींपेक्षा संख्येने दसपट जास्त पण आकाराने सूक्ष्म असतात. ग्लियापेशी चेतापेशींना (न्युरॉन्सना) आधार देतात, पोषक पदार्थ पुरवतात. चेतापेशीअक्षाभोवती मेदयुक्त मायलीनचे आवरण तयार करतात. त्यामुळे संदेशवहनात विद्युतप्रवाहाची गळती होत नाही.

सीएसएफमधील युरियाचे प्रमाण वाढल्यास आकलनक्षमता घटते, विसरभोळेपणा वाढतो. मेंदूचे ट्युमर असणाऱ्या रुग्णांत युरिक आम्लाचे प्रमाण वाढलेले दिसते. तर पार्किन्सन्सच्या रुग्णांत ते घटलेले आढळते. सीएसएफचे अस्तित्व तीन हजार वर्षांपूर्वी कळले पण त्याच्या कचरावाहक कार्याचे तपशील गेल्या वीस वर्षात समजले, हे फार आश्चर्यकारक आहे.- नारायण वाडदेकर