दक्षिण आफ्रिका अपराजित

महाराष्ट्र टाइम्स

South Africa continues its unbeaten streak in the T20 World Cup. They secured a five-wicket victory against Zimbabwe in a Super 8 match. Despite a strong performance from Zimbabwe's captain Sikandar Raza, South Africa chased down the target. Key partnerships in the middle and lower order ensured their win. South Africa remains the only undefeated team in the tournament.

south africas team remains undefeated continuing a winning streak in the super 8

दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड कप टी-२० क्रिकेटमधील धडाका शनिवारी कायम राखला. ‘ सुपर ८ ’मधील लढतीत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा पाच विकेटनी पराभव केला. यंदाच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका संघ अपराजित आहे.

अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने कॅगिसो रबाडा, मार्को यान्सन आणि केशव महाराज यांना विश्रांती दिली, त्याजागी ॲनरिक नॉर्किया, क्वेना माफाका आणि जॉर्ज लिंडे यांना संधी दिली. झिम्बाब्वेकडून कर्णधार सिकंदर रझाने फटकेबाजी केली. मात्र, इतर फलंदाजांना चमक दाखवता आली नाही. भारताविरुद्ध नाबाद ९७ धावा करणारा बेनेट पंधरा धावांची खेळी करू शकला.

प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम चार धावा, तर क्विंटन डिकॉक खाते न उघडता परतला. सिकंदरनेच दोघांना परतीचा मार्ग दाखवला. रायन रिकल्टनही ३१ बाद झाल्याने त्यांची ३ बाद ४३ अशी स्थिती झाली होती. मिलर-ब्रेव्हिस यांनी २५ चेंडूंत ५० धावांची भागीदारी रचली. तर स्टब्स आणि लिंडे यांनी ४३ चेंडूंत ५३ धावांची अभेद्य भागीदारी रचून दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

स्कोअरबोर्ड : झिम्बाब्वे २० षटकांत ७ बाद १५३ (सिकंदर रझा ७३ धावा - ४३ चेंडूंत ८ चौकार व ४ षटकार, माफाका ४-०-२१-२, बॉश ४-०-४०-२) वि. दक्षिण आफ्रिका १७.५ षटकांत ५ बाद १५४ (रायन रिकल्टन ३१, ब्रेव्हिस ४२-१८ चेंडूंत दोन चौकार व ४ षटकार, जॉर्ज लिंडे नाबाद ३०-२१ चेंडूंत २ चौकार, १ षटकार, रझा ४-०-२९-३).