वर्धा मार्गावर गुंडाला शस्त्रासह अटक

महाराष्ट्र टाइम्स

Belatarodi police apprehended a gangster identified as Mukesh Vijendrasingh Baghel. He was found with a sharp iron knife. The incident occurred on Wardha Road. Police patrolling led to his arrest. The weapon has been seized. This action highlights police vigilance in the area.

वर्धा मार्गावर गुंडाला शस्त्रासह अटक

नागपूर : बेलतरोडी पोलिसांनी एका गुंडाला शस्त्रासह अटक केली आहे. मुकेश विजेंद्रसिंग बघेल (वय २८, रा. वैशालीनगर झोपडपट्टी, बेलतरोडी) असे या आरोपीचे नाव आहे. ही घटना २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.५० वाजताच्या सुमारास घडली. बेलतरोडी पोलिसांचे गस्त पथक गस्त घालत असताना त्यावेळी वर्धा मार्गावरील शिवणगाव पुनर्वसन ते चिचभवनदरम्यान मुकेश संशयितरित्या फिरत असल्याचे त्यांना दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे लोखंडी धारदार चाकू आढळून आला. पोलिसांनी चाकू जप्त करून मुकेशला अटक केली.