पिकअप व्हॅन उलटून १६ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात भीषण अपघात झाला. चिकलिया गावाजवळ पिकअप व्हॅन उलटली. या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला. व्हॅनमध्ये ४६ प्रवासी होते. बहुतांश प्रवासी श्रमिक होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. व्हॅन समोरून येणाऱ्या एसयूव्हीवर आदळली. श्रमिक घरी परतत होते.

16 laborers killed in pickup van accident in madhya pradesh

मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील चिकलिया गावाजवळ बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातातील मृतांची संख्या १६ वर पोहोचली आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटलेली एक पिकअप व्हॅन समोरून येणाऱ्या एका एसयूव्हीवर आदळल्याने हा अपघात झाला होता. या व्हॅनमध्ये असणाऱ्या ४६ प्रवाशांतील बहुतांश प्रवासी श्रमिक होते. इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री साडेआठ ते नऊ या सुमारास ही दुर्घटना घडली. या व्हॅनमधील श्रमिक घरी परतत होते. पिकअप व्हॅनच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली व समोरून येणाऱ्या एसयूव्हीवर जाऊन आदळली.