नवी दिल्ली : दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्राला गेल्या काही दिवसांपासून भाजून काढणाऱ्या तीव्र उष्णतेच्या लाटेत गुरुवारी दुपारी हवामानात अचानक बदल होऊन वादळी पावसाने हजेरी लावली. काही भागांत गारपीटही झाली. या अवकाळी पावसामुळे काही काळ सुखद गारवा निर्माण झाला. सफदरजंग वेधशाळेने गुरुवारी किमान तापमान २५.४ अंश नोंदवले. दिल्ली-नोएडामध्ये भरदिवसा अंधारून आले व काही मिनिटांत अनेक भागांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाने हजेरी लावली.






