काँग्रेस नेते पवन खेरा यांना अटकपूर्व जामीन मिळणार की नाही यावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर केलेल्या आरोपप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. खेरा यांना अटक करण्याची गरज काय, असा प्रश्न न्यायालयाने विचारला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वशर्मा यांच्या पत्नीवर केलेल्या आरोपप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी केलेल्या याचिकेवरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राखून ठेवला. ‘खेरा यांना अटक करण्याची काय आवश्यकता आहे,’ असा प्रश्न वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी न्यायालयास केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवादानंतर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला.