मानखुर्द परिसरात क्रेन कोसळून पोलिसाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी मुंबई महापालिकेने कंत्राटदाराला एक कोटी रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
संतोष चव्हाण असे मृत पोलिसाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी निष्काळजीने मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा कंत्राटदारावर दाखल केला आहे. आता पालिकेनेही कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कंंत्राटदाराला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.






