का वाढतोय हा प्रकार?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

इंटर्नशिपची अनिवार्यता आणि वेळेचा अभाव यामुळे विद्यार्थी ऑनलाइन संधी शोधतात. आकर्षक ऑफर्स पाहून पडताळणी न करता निर्णय घेतले जातात. बनावट वेबसाइट्स आणि ई-मेल्समुळे फसवणूक होते. सोशल मीडियावर नोकरीचे आमिष दाखवून नोंदणी शुल्क मागून फसवण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे विद्यार्थी आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत.

increasing need for internships among students and dangers of online opportunities

इंटर्नशिपची अनिवार्यता, अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्रमाणपत्र आवश्यक असल्याने विद्यार्थ्यांच्या हाती असणारा अपुरा वेळ, अधिकृत आणि पडताळणी केलेल्या प्लॅटफॉर्मचा अभाव; महाविद्यालयांकडून न मिळणारे स्पष्ट मार्गदर्शन अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थी स्वतःच ऑनलाइन संधी शोधतात. लवकर संधी मिळवण्याची घाईही अनेकांना नडते. आकर्षक ऑफर पाहून पडताळणी न करता निर्णय घेतले जातात. डिजिटल माध्यमांवर असणारा अंधविश्वासही या गुन्ह्यांना खतपाणी घालतो. आकर्षक वेबसाइट, बनावट ई-मेल आणि ‘तत्काळ निवड’ होत असल्यामुळे खरे-खोटे ओळखणे कठीण जाते. सोशल मीडिया वर ‘सोशल मीडिया मॅनेजर’सारख्या पदांच्या जाहिराती देऊन नंतर नोंदणी शुल्क मागून संपर्क तोडण्याचे प्रकारही वाढले आहेत.