‘एक कविता तळ्याकाठी’ रंगला

महाराष्ट्र टाइम्स

सार्वजनिक वाचनालयाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त प्रबोधनकार ठाकरे सरोवर येथे पुस्तक प्रदर्शन आणि 'एक कविता तळ्याकाठी' हा कार्यक्रम आयोजित केला. उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते पुस्तकाची गुढी उभारून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात कवी आणि कलाकारांनी कविता सादर केल्या. यावेळी वाचनालयाचे पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि वाचक उपस्थित होते. प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन वाचण्याचा आनंद वेगळा असल्याचे सांगण्यात आले.

‘एक कविता तळ्याकाठी’ रंगला
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून गुरूवारी प्रबोधनकार ठाकरे सरोवर (काळा तलाव) येथे पुस्तक प्रदर्शन आणि एक कविता तळ्याकाठी कार्यक्रम आयोजित केला होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन कल्याण-डोंबिवली महापालिकेचे उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्या हस्ते पुस्तकाची गुढी उभारून करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी यांनी उपस्थितांशी संवाद साधताना, ‘आजच्या डिजिटल युगात ई-बुक्स आणि ऑडिओ बुक्स उपलब्ध असली, तरी प्रत्यक्ष हातात पुस्तक घेऊन वाचण्याचा आनंद निराळाच असतो,’ असे सांगितले.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे 'एक कविता तळ्याकाठी' हा उपक्रम ठरला. सरोवराच्या काठावर, निसर्गरम्य वातावरणात कवी मकरंद वांगणेकर, सुधाकर कांबळी, सिने-नाट्य अभिनेते सुधाकर वसईकर, रंगकर्मी सुधीर चित्ते, स्वाती नातू, जया पाटील, संयुक्ता राठोड, मंगला कांकणे आणि सुरेखा गावंडे यांनी कविता सादर केल्या.

याप्रसंगी वाचनालयाचे ॲड. सुरेश पटवर्धन, कार्यकारिणी सदस्य अरविंद शिंपी, विजयसिंह परदेशी, बाळकृष्ण धुरी, प्रगती महाविद्यालयाच्या प्रा. मालती पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महाविद्यालयीन विद्यार्थी, रसिक वाचक आणि ग्रंथप्रेमी उपस्थित होते.