फसवणुकीचे वाढते प्रकार लक्षात आल्याने अनेक जण इंटर्नशिप घेताना अधिक साशंक झाले आहेत. परिणामी, इंटर्नशिप घ्यावी की टाळावी, असा संभ्रम तरुणांमध्ये वाढताना दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते, ही केवळ आर्थिक फसवणूक नसून करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम करणारी गंभीर समस्या आहे. कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर या तरुणांच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक ठरत आहे. इंटर्नशिप प्रक्रियेत पारदर्शकता, अधिकृत मार्गदर्शन आणि कडक नियंत्रण यांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.






