‘गंध फुलांचा...’ मराठी गीतांची मैफल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबईत संगीत कला विद्यालयातर्फे 'गंध फुलांचा गेला सांगून' हा मराठी गीतांचा कार्यक्रम १७ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता दादर येथील वीर सावरकर सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात आशा भोसले, लता मंगेशकर, सुरेश वाडकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाजलेल्या गीतांचे सादरीकरण केले जाईल. गीतांजली रवी कोटियन या कार्यक्रमाच्या आयोजिका आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.

gandh phulanch special marathi song event

मुंबई : संगीत कला विद्यालयातर्फे मराठी गीतांचा खास कार्यक्रम ‘गंध फुलांचा गेला सांगून’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम १७ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता दादर पश्चिमेकडील शिवाजी पार्क येथील वीर सावरकर सभागृहात पार पडणार आहे. जुन्या-नव्या मराठी गीतांची मेजवानी असलेल्या या कार्यक्रमात आशा भोसले , लता मंगेशकर , सुरेश वाडकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गाजवलेल्या गीतांचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमाच्या आयोजिका गीतांजली रवी कोटियन असून सूत्रसंचालन भालचंद्र गोखले, संगीत संयोजन प्रशांत लळीत करणार आहेत. ध्वनी अभियंता निखिल पांचाळ व व्हिडीओ शूटिंगची धुरा संदीप वगळ सांभाळणार आहेत. प्रवेश विनामूल्य आहे.