‘मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न दिले’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यातील सेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांना सीबीआयने अटक केली आहे. हवालदार यांनी पैशाच्या बदल्यात 'नीट' परीक्षेचे प्रश्न आणि मजकूर विद्यार्थ्यांना दिल्याचा दावा सीबीआयने केला आहे. त्या भौतिकशास्त्राच्या पेपरसाठी अनुवादक म्हणून काम करत होत्या. पेपरफुटी प्रकरणातील त्या प्रमुख सूत्रधार असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

manisha hawaldar took money for questions in the neet case

पुणे : ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी अटक झालेल्या मनीषा हवालदार या पुण्यातील सेठ हिरालाल सराफ प्रशालेच्या मुख्याध्यापिकीने पैशाच्या बदल्यात प्रश्न आणि मजकूर विद्यार्थ्यांना दिल्याचा दावा सीबीआयने तिची कोठडी मागतात पुणे न्यायालयात केला. ‘नीट’ परीक्षेच्या भौतिकशास्त्राच्या पेपरसाठी अधिकृत अनुवादक म्हणून काम केलेली हवालदार पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.