बिजू जनता दलाचे राज्यसभा खासदार देबाशीष समंतराय यांनी पक्षासोबतच खासदारकीचा राजीनामा दिला आहे. पक्षात डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. समंतराय लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. हा राजकीय भूकंप मानला जात आहे. यामुळे ओडिशातील राजकारणात मोठे बदल अपेक्षित आहेत.
भुवनेश्वर : बिजू जनता दलाचे (बीजेडी) राज्यसभा खासदार देबाशीष समंतराय यांनी सोमवारी पक्षासह खासदारकीचाही राजीनामा दिला. पक्षात आपल्याला पद्धतशीरपणे डावलले जात असल्याचा आरोप करत हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. ते वकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.