ओसामाच्या अंताची थरारक कहाणी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड येथे ओसामा बिन लादेनच्या अंताची रोमांचकारी सत्यकथा या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. शंकर गोविंद वीरकर हे यावर मार्गदर्शन करतील. अमेरिकेवरील हल्ल्यानंतर ओसामाचा शोध, गुप्त कारवाई आणि त्याच्या अंतापर्यंतचा थरार उलगडण्यात येईल. हे व्याख्यान ८ मे रोजी सायंकाळी सहा वाजता होईल. प्रवेश विनामूल्य आहे.

the thrilling true story of osama bin ladens end

मुंबई : ‘महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड’ यांच्या कला विभागातर्फे ‘ओसामा बिन लादेनच्या अंताची रोमांचकारी सत्यकथा’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे व्याख्यान आज, शुक्रवार ८ मे रोजी मुलुंड पश्चिमेकडील संस्थेचे सुविधा शंकर गोखले स्मृती सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता पार पडणार असून वक्ते शंकर गोविंद वीरकर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

सप्टेंबर २०११ रोजी अमेरिकेवरील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर ओसामा बिन लादेनचा शोध, अमेरिकेची गुप्त कारवाई आणि त्याच्या अंतापर्यंतचा थरार या व्याख्यानातून उलगडण्यात येणार आहे. यासाठी प्रवेश विनामूल्य आहे.