गुंतवणूकदारांसाठी लाभाचे ‘औषध’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गुंतवणूकदारांसाठी ग्रॅन्युल्स इंडिया आणि कॅप्लिन पॉइंट लॅबोरेटरीज या औषध कंपन्या फायदेशीर ठरू शकतात. दोन्ही कंपन्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ अपेक्षित आहे. ग्रॅन्युल्स इंडिया विविध औषधांचे घटक आणि तयार औषधे बनवते. कॅप्लिन पॉइंट लॅबोरेटरीजची औषधे अमेरिका, आफ्रिका आणि युरोपमध्ये विकली जातात. दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांसाठी लाभाचे ‘औषध’

षधे उत्पादन क्षेत्रात वेगाने प्रगती करणाऱ्या ग्रॅन्युल्स इंडिया लि. आणि कॅप्लिन पॉइंट लॅबोरेटरीज लि.मध्ये सार्वजनिक गुंतवणूकदारांची भागधारकता, म्युच्युअल फंड आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांहून अधिक आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये दोन्ही कंपन्यांच्या एकूण आर्थिक उत्पन्न दरात सातत्याने वाढ झाली आहे. त्याबाबत विस्तृतपणे जाणून घेऊ.

ग्रॅन्युल्स इंडिया लिमिटेड


गुंतवणूकदारांसाठी लाभाचे ‘औषध’

कंपनी विविध रोगांवर उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या तीन प्रकारची औषधे तयार करते. त्यामध्ये रोगावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारे विविध औषधांतील घटक तयार करते. त्याचसोबत औषध तयार करताना इतर निष्क्रिय घटक काढून टाकणारे घटक तयार करते. आणि काही थेट वापरण्यात येणारी औषधे तयार करते.

कंपनीच्या 'फर्स्ट लाइन ऑफ डिफेन्स' उत्पादनात पॅरासिटामॉल, आयबुप्रोफेन, मेटफॉर्मिन आणि ग्वाइफेनेसिन चा विशेष समावेश आहे.

भागधारकता : प्रवर्तक ३८.०२%, सार्वजनिक गुंतवणूकदार २९.६७%, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार १५.३१% आणि म्युच्युअल फंड २.८५%.

एकूण आर्थिक उत्पन्न : आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत कंपनीचे एकूण आर्थिक उत्पन्न ६% वाढून १.४७ हजार कोटी रुपये झाले आहे.

निव्वळ आर्थिक उत्पन्न : मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीचे निव्वळ आर्थिक उत्पन्न ३४.२% वाढून २०१.५७ कोटी रुपये झाले आहे.

ग्रॅन्युल्स इंडियाचे सात उत्पादन प्रकल्प आहेत. त्यापैकी सहा भारतात आणि एक अमेरिकेत आहे. तसेच, संयुक्त उपक्रम कंपन्यांच्या माध्यमातून भारत आणि चीनमध्ये कंपनीचे दोन कार्यरत उत्पादन युनिट्स आहेत. कंपनीचा जगभरात ६० देशांमध्ये व्यवसाय विस्तार आहे.

मूलभूत दृष्टिकोन : कंपनीची पाच वर्षांची चक्रवाढ विक्री दरवाढ ११% आणि समभागाची मागील पाच वर्षांची सीएजीआर वाढ १८% आहे. पाच वर्षांचा इक्विटी परतावा १५% आहे.

तांत्रिक दृष्टिकोन : गुंतवणूक तज्ज्ञांच्या मते, अल्पावधीत समभाग किंमतीत ७६५ रुपये स्तरावर नफावसुली दिसून आली, तरीही समभाग किंमतीमधील तेजी ८२५ रुपये स्तरापर्यंत राहण्याची शक्यता अधिक आहे. समभाग किंमतीचा एक वर्षाचा बीटा १ आहे. समभाग किंमतीचा १०० दिवसांचा सरासरी स्तर ६१५ रुपये आहे.

कॅप्लिन पॉइंट लॅबोरेटरीज लिमिटेड

कंपनीची स्थापना १६ एप्रिल १९९० रोजी झाली. ही कंपनी औषधनिर्माण क्षेत्रात सातत्याने प्रगती करत आहे. कंपनीचे मुख्य संशोधन आणि विकास केंद्रे भारतातील तामिळनाडू येथे आहे. आणि भारतातील पुदुचेरी येथे औषधे उत्पादन प्रकल्प आहे. कंपनीची औषधे प्रामुख्याने अमेरिका, आफ्रिका आणि युरोप (मधील बाजारपेठेत) मध्ये वितरित होतात.

भागधारकता : प्रवर्तक ७०.५७%, सार्वजनिक गुंतवणूकदार २१.१४%, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार ६.१५% आणि म्युच्युअल फंड २.०२%. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची भागधारकता २०२२ पासून सातत्याने वाढत आहे.

एकूण आर्थिक उत्पन्न : आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत कंपनीचे एकूण आर्थिक उत्पन्न १०.६% वाढून ६००.१६ कोटी रुपये झाले आहे.

निव्वळ आर्थिक उत्पन्न : मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीचे निव्वळ आर्थिक उत्पन्न ३.८% वाढून १७०.११ कोटी रुपये झाले आहे.

मूलभूत दृष्टिकोन : कंपनीची पाच वर्षांची चक्रवाढ विक्री दरवाढ १६% आणि पाच वर्षांतील चक्रवाढ नफा दरवाढ २२% आहे. समभागाची मागील पाच वर्षांची सीएजीआर वाढ २६% आहे. पाच वर्षांचा इक्विटी परतावा २३% आहे.

तांत्रिक दृष्टिकोन : कंपनी मागील पाच वर्षांपासून सप्टेंबरमध्ये वार्षिक लाभांश आणि मे महिन्यात अंतरिम लाभांश देत आहे. यावर्षी कंपनीने २९ मे २०२६ रोजी प्रतिसमभाग ४ रुपये अंतरिम लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. समभाग किंमतीत महिनाभरात १३%हून अधिक वाढ झाली आहे. सध्या ॲव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स २५ हून अधिक असल्यामुळे समभाग किंमतीत तेजी राहण्याचे संकेत मिळत आहेत. समभाग किंमतीचा २०० दिवसांचा सरासरी स्तर १,९०४ रुपये आहे. आणि समभाग किंमतीचा एक महिन्याचा बीटा २ आहे. त्यामुळे छोट्या गुंतवणूकदारांनी ट्रेडिंग स्वरूपात समभागाची खरेदी पूर्णपणे टाळावी. अभ्यासकांच्या मते, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स ७२ असल्यामुळे समभाग किंमतीत २,१६० रुपये स्तरावर नफा वसुली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण, समभाग १,८९५ रुपयांपर्यंत घसरल्यास पुन्हा एकदा भागखरेदीचा ओघ वाढेल.