‘त्या’ महिलांनान्यायालयीन कोठडी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कल्याणमधील बल्याणी येथील खजुरीनगर परिसरात अनधिकृत चाळींवर कारवाई सुरू होती. या कारवाईला विरोध करणाऱ्या काही महिलांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला काळे यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी तीन महिलांना कल्याण न्यायालयाने कोठडी सुनावली आहे. पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या कारवाईला विरोध करणे महागात पडले आहे.

women sentenced to judicial custody police attack incident in khajurinagar area

कल्याण : बल्याणी येथील खजुरीनगर येथील अनधिकृत चाळीवर कारवाई करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला काळे यांच्यावर हल्ला झाला होता. या प्रकरणातील तीन महिलाना कल्याण न्यायालयात कोठडी सुनावली.

बल्याणी खजुरीनगर परिसरात असलेली २८० अनधिकृत चाळीतील घरे आणि ५० जोते यांच्यावर महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विभागाकडून कारवाई सुरू करताच, स्थानिकांनी विरोध केला होता. विरोध करणाऱ्या महिलांना रोखण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला काळे यांच्या नेतृत्वाखालील पथक तैनात होते. काही महिलांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवत काळे यांना जखमी केले होते.