ठाणे, कल्याणमध्ये ‘श्वासात राजं, ध्यासात राजं!’

महाराष्ट्र टाइम्स

होरायझन इव्हेंट्सच्या तपपूर्ती वर्षानिमित्ताने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून 'श्वासात राजं, ध्यासात राजं!' हा विशेष कार्यक्रम ठाणे आणि कल्याण येथे सादर होत आहे. या कार्यक्रमात मृणाल कुलकर्णी, अजय पूरकर, दिग्पाल लांजेकर आणि अवधूत गांधी सहभागी होणार आहेत. स्वराज्याच्या निर्मितीतील विस्मरणात गेलेल्या वीरांची माहिती यातून मिळेल. महाराष्ट्र टाइम्स कल्चरल क्लबच्या सदस्यांना तिकिटांवर विशेष सवलत आहे.

ठाणे, कल्याणमध्ये ‘श्वासात राजं, ध्यासात राजं!’
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

‘होरायझन इव्हेंट्स’च्या तपपूर्ती वर्षानिमित्ताने शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून 'श्वासात राजं, ध्यासात राजं!' हा विशेष कार्यक्रम शनिवार, ६ जून रोजी रात्री ८.४५ वाजता कल्याणच्या अत्रे रंगमंदिर येथे, तसेच 'अपूर्वा प्रोडक्शन'च्या सहयोगाने रविवार, ७ जून रोजी दुपारी ४.४५ वाजता काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे सादर केला जाणार आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चरल क्लब कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत.

मध्यंतरविरहित हा कार्यक्रम सलग पावणेदोन तास असून कल्याण, डोंबिवली आणि ठाणे परिसरामध्ये पहिल्यांदाच सादर होत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते अजय पूरकर, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि गायक अवधूत गांधी यांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. स्वराज्याच्या निर्मितीत योगदान देणाऱ्या, विस्मरणात गेलेल्या पण अढळ ठसा उमटवणाऱ्या वीरांच्या कथा या कार्यक्रमात मांडल्या जातात. अतिशय परिणामकारक अभिवाचनाने स्वराज्याचा गौरवशाली इतिहास रसिकांपुढे उभा केला जातो.

कार्यक्रमाच्या प्रवेशिका ५०० रुपये, ४०० रुपये, ३०० रुपये अशा दरात उपलब्ध आहेत. त्यासाठी प्रशांत दांडेकर ९८२०५७८२९८ आणि स्वप्नील भाटे ९८२०२३२६५९ यांच्याशी संपर्क साधावा. ऑनलाइन प्रवेशिका 'तिकीट खिडकी' या संकेतस्थळावर, तसेच दोन्ही नाट्यगृहांवर तिकिटे उपलब्ध आहेत.

'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'च्या वार्षिक सदस्यांना तिकीट एकावर एक मोफत मिळणार आहे. सदस्यांनी तिकिटासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी ९८१९५८१०७७ या क्रमांकावर व्हॉट्सअॅप मेसेज करावा. या योजनेतील तिकिटांची उपलब्धता मर्यादित आहे.