कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात पावसाळ्यापूर्वी तपासणी करून १० प्रभागांतील २६८ खराब, सडलेले, जुने धोकादायक पथदिवे खांब बदलण्यात आले, तर १९८ नादुरुस्त फिटिंग ब्रॅकेट व १२ वितरण कंट्रोल पॅनल बदलण्यात आले.
कल्याण, डोंबिवली शहरांतील विद्युत विभागाकडून ३३ हजार ८७० पथदिवे खांबे आणि एकेचाळीस हजार ९०७ विजेचे दिवे बसविण्यात आले आहेत. शहरातील सर्व महत्त्वाच्या चौकात आणि रस्त्यावरील अंधार दूर करण्यात आल्याने नागरिकांना सुरक्षित प्रवास करणे शक्य झाले आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व तपासणीच्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील पथदिवे, इमारती, दवाखाने, नागरी आरोग्य केंद्रातील वीज संच दुरुस्तीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या कारवाईअंतर्गत शहरातील धोकादायक खांब हटविण्यात आल्याचे विद्युत विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






