मुंब्रा येथे एका व्यावसायिकाला अडीच लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला गेला. सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेतले. पैसे काढल्याचे लक्षात येताच व्यावसायिकांनी तात्काळ खाती ब्लॉक केली. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
मुंब्रा येथील एका व्यावसायिकाची अडीच लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली असून सायबर गुन्हेगारांनी परस्पर त्यांच्या बँक खात्यातील पैशांवर डल्ला मारला आहे. आपल्या खात्यावरील पैसे लंपास झाल्याचे समजताच व्यावसायिकाने तात्काळ बँक खाती ब्लॉक केली. या प्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.