भटक्या श्वानांची होणार गणना

Contributed byमुख्य पशुवैद्यकीय अधिकारी,तेजस टवलारकर Tejas.Tawalarkar@timesofindia.com|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे महापालिका शहरात भटक्या श्वानांची अचूक गणना करणार आहे. यासाठी एक नवीन मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले जात आहे. पुढील सहा महिन्यांत ही गणना पूर्ण होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महापालिका निवारा केंद्रे उभारण्याचे काम करत आहे. या गणनेमुळे श्वानांच्या संख्येनुसार निवारा केंद्रांची योजना आखता येईल. शिंदेवाडी आणि भूगाव येथे निवारा केंद्रे उभारली जात आहेत.

भटक्या श्वानांची होणार गणना

पुणे : शहरातील भटक्या श्वानांची अचूक संख्या समजण्यासाठी महापालिका पशुवैद्यकीय विभागातर्फे श्वानांची गणना करण्यात येणार आहे. ऑनलाइन अ ॅप्लिकेशनच्या माध्यमातून गणना करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. पुढील सहा महिन्यांत गणना पूर्ण करण्यात येणार असल्याचे पशुवैद्यकीय विभागाने सांगितले.

गणनेसाठी मोबाइल अ ॅप्लिकेशन तयार करण्यात येणार आहे. या अ ॅपच्या माध्यमातून शहरातील विविध भागांतील भटक्या श्वानांची नोंद केली जाणार आहे. गणना करताना श्वानांचे ठिकाण, संख्या आणि परिसराची माहिती नोंदवता यावी, यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येत आहे. अ ॅप्लिकेशनमुळे एकाच श्वानाची दोनदा नोंद होण्याची शक्यता कमी होईल. अधिक अचूक माहिती मिळेल; तसेच २०२३मध्येही अ ॅप्लिकेशनद्वारेच गणना केली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भटक्या श्वानांची होणार गणना

भटक्या श्वानांची होणार गणना

सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वीच देशभरातील शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, क्रीडा संकुले, बस स्थानके आणि रेल्वे स्थानक येथून भटक्या श्वानांना तत्काळ हटवायचा आदेश दिला होता. राज्य सरकारनेही श्वानांना पकडून निवारा केंद्रात पाठवा, असा आदेश दिला होता. या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय विभागाने उपाययोजना सुरू केल्या असून, यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी शहरातील भटक्या श्वानांची अचूक संख्या समजणे आवश्यक आहे. या आराखड्यानुसार एक लाख श्वानांसाठी किमान २० निवारा केंद्रे उभारावी लागतील. सध्या शिंदेवाडी आणि भूगाव येथे निवारा केंद्रे उभारली जात आहेत. या दोन्ही निवारा केंद्रांचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.