मुंबईतच बालपण आणि सुरुवातीचे वैद्यकीय शिक्षण घेतलेले दादरमधील एक मराठी डॉक्टर ब्रिटनमधील ऐतिहासिक ‘रॉयल टाऊन ऑफ सटन कोल्डफिल्ड’चे महापौर बनले आहेत. डॉ. नितीश राऊत यांना हा बहुमान मिळाला असून, या निमित्ताने मराठीचा झेंडा पुन्हा सातासमुद्रापार झळकला आहे.
मुंबईतील दादर येथील मूळ रहिवासी असलेल्या डॉ. नितीश राऊत यांची बर्मिंगहॅमजवळच्या ‘रॉयल टाउन ऑफ सटन कोल्डफिल्ड’च्या महापौरपदी नुकतीच निवड झाली. ‘रॉयल टाउन ऑफ सटन कोल्डफिल्ड’ला १५२८ मध्ये राजे हेन्री आठवे यांनी ‘रॉयल टाउन’चा दर्जा बहाल केला होता. ब्रिटनमधील मोजक्याच शहरांना हा सन्मान लाभला आहे. अशा ऐतिहासिक शहराच्या महापौरपदी २०२६-२७ वर्षासाठी डॉ. राऊत हे विराजमान झाले आहेत. डॉ. राऊत हे या शहराचे भारतीय वंशाचे पहिले महापौर, वेस्ट मिडलँड्स भागातील पहिले हिंदू महापौर आणि ब्रिटनमधील पहिले मराठी महापौर असल्याचे मानले जाते.
दादर पश्चिम येथे बालपण गेलेले डॉ. नितीश यांचे शिक्षण किंग जॉर्ज शाळेतून झाले. त्यांनी १९९४ मध्ये जे. जे. मेडिकल कॉलेजमध्ये (पान ६वर)





