आंबेनळी घाटात अपघातात आठ ठार

महाराष्ट्र टाइम्स

रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात एक भीषण अपघात झाला. स्कॉर्पिओ कार १२०० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. सुट्टीसाठी दापोलीला आलेले हे तरुण साताऱ्याकडे परत जात होते. अपघाताची माहिती उशिरा उघडकीस आली. बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून शोधकार्य सुरू आहे.

आंबेनळी घाटात अपघातात आठ ठार
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ कार १२०० फूट खोल दरीत कोसळून आठ तरुणांचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री झालेला हा अपघात जवळपास २४ तासांनी उघडकीस आला. अपघातातील सर्व मृत तरुण सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी होते.

सर्व आठही तरुण सुट्टीच्या निमित्ताने कोकणातील दापोली येथे आले होते. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास ते दापोली येथून साताऱ्याकडे निघाले. रविवारी दिवसभर या सगळ्यांचे फोन लागत नसल्याने त्यांच्या पालकांनी सातारा पोलिसांची मदत घेतली. तपासाअंती या सर्वांचे संपर्कस्थळ आंबेनळी घाटात दर्शवत होते. त्यानंतर रायगड पोलिसांनी रविवारी रात्री दहाच्या सुमारास संपर्कस्थळाचा शोध घेतला असता तरुणांची स्कॉर्पिओ कार आंबेनळी घाटातील कठडा तोडून १२०० फूट खोल दरीत कोसळल्याचे निदर्शनास आले.

पोलादपूर पोलिस व स्थानिक प्रशासनाने शोधमोहीम हाती घेतली. प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर ट्रेकर्स, सह्याद्री ट्रेकर्स तसेच महाड येथील सिस्केप रेस्क्यू टीमने संयुक्तरीत्या शोधमोहीम हाती घेतली. रविवारी रात्री सुमारे दहा वाजल्यापासून दोरांच्या सहाय्याने बचाव पथके खोल दरीत उतरली. मात्र, दरीची खोली आणि अतिशय दुर्गम परिसर यामुळे वाहनापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने (पान ६ वर)