सात तास जीव टांगणीला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

गुलमर्ग गोंडोला केबल कार सोमवारी तांत्रिक बिघाडामुळे अचानक बंद पडली. यामुळे सुमारे ३०० पर्यटक तब्बल सात तास ५०० फूट उंचीवर अडकून राहिले. पावसाचा मारा सहन करत पर्यटकांनी हा थरार अनुभवला. राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. पर्यटकांना सुरक्षित खाली आणण्यात आले.

सात तास जीव टांगणीला

जमिनीपासून ५०० फूट उंचीवर रोप वे मध्येच बंद पडलेली, त्यात पावसाचा मारा, अशा अवस्थेत तब्बल सात तास अडकून पडल्याचा अनुभव काश्मिरातील ३०० पर्यटकांना सोमवारी आला.

आशियातील सर्वात उंच रोप वे असा नावलौकिक असलेला ‘ गुलमर्ग गोंडोला ’ (गुलमर्ग केबल कार सेवा) काश्मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांंमध्ये विशेष लोकप्रिय आहे. या रोप वेमध्ये बसून गुलमर्गचे निसर्गसौंदर्य न्याहाळणे नित्याचेच. मात्र, सोमवारी हाच गोंडोला तांत्रिक कारणांमुळे बंद पडला. त्यामुळे ६५ केबल कारमधील ३०० पर्यटकांचा जीव शब्दशः टांगणीला लागला.

रोप वे बंद पडल्याचे समजताच राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांनी मदतीसाठी धाव घेतली. काही ठिकाणी तर अडकलेल्या केबल कारची उंची जमिनीपासून ५०० (पान ९ वर)