पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत सोमवारी पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. पेट्रोलच्या दरांत लिटरमागे २.६१ रुपये तर डिझेलच्या दरांत प्रतिलिटर २.७१ रुपयांनी वाढ करण्यात आली. गेल्या ११ दिवसांतील ही चौथी दरवाढ आहे. अनेक शहरांमध्ये डिझेलचे दर प्रतिलिटर शंभराच्या उंबरठ्यावर आले आहेत. नजीकच्या काळात इंधनाच्या दरांत आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटात भारतात दर न वाढविल्याने पेट्रोलियम कंपन्यांना झालेला मोठा तोटा पहाता आणखी काही काळ टप्प्याटप्याने दरवाढ करणे अनिवार्य असेल. कच्च्या तेलाची खरेदी आणि शुद्धीकरण खर्च व किरकोळ विक्रीच्या किंमती यांमधील तफावत (पान ६ वर)





