सेन्सेक्स उसळला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सोमवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्याने सेन्सेक्स १०७३ अंकांनी वाढून ७६४८८ वर बंद झाला. निफ्टीही ३१२ अंकांनी वधारून २४०३१ वर पोहोचला. बीएसईवर २७८५ कंपन्यांचे समभाग वाढले. रुपया ३५ पैशांनी मजबूत झाला. बाजारात उत्साहाचे वातावरण होते.

सेन्सेक्स उसळला

कच्च्या खनिज तेलाच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे सोमवारी शेअर बाजारांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी, बीएसई सेन्सेक्स १,०७३.६१ अंकांनी उसळून ७६,४८८.९६वर बंद झाला. एनएसई निफ्टी ३१२.४० अंकांनी वधारत २४,०३१.७०वर बंद झाला. बीएसईवर एकूण २,७८५ कंपन्यांचे समभाग वधारले. १,५३५ कंपन्यांचे समभाग घसरले आणि २११ कंपन्यांचे समभाग जैसे थे राहिले. त्याचवेळी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ३५ पैशांनी मजबूत झाला.

सविस्तर वृत्त... १०