आरटीओ कर्मचारी संपावर जाणार

महाराष्ट्र टाइम्स

मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. पदोन्नती, सेवा प्रवेश नियम आणि आश्वासित प्रगती योजना रखडल्याने आरटीओ कर्मचारी संपावर जाणार आहेत. मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यात तीन टप्प्यांत आंदोलन होणार आहे. १६ जूनपासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. तत्पूर्वी २ जून रोजी दोन तासांची निदर्शने आणि ९ जूनला एक दिवसीय संप होणार आहे.

rto workers strike discontent in motor vehicle department

पदोन्नती , सेवा प्रवेश नियम आणि आश्वासित प्रगती योजना रखडल्याने मोटार वाहन विभाग ातील कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. यामुळे आरटीओ कर्मचाऱ्यांनी संपाचा निर्णय घेतला आहे. मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यात तीन टप्प्यांत आंदोलन करण्यात येणार असून, मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनांनी १६ जूनपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. तत्पूर्वी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी २ जून रोजी दोन तासांची निदर्शने आणि ९ जूनला एक दिवसीय संप पुकारण्यात येणार आहे.

कर्मचारी वर्गातील वाढती नाराजी लक्षात घेऊन राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी सांगितले. प्रलंबित मागण्यांवर तत्काळ निर्णय न झाल्यास संघर्ष तीव्र करण्याचा इशारा सरतापे यांनी दिला आहे.