सरस्वती कॉलेजच्या एनएसएस उपक्रमांची सांगता

महाराष्ट्र टाइम्स

खारघर येथील सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने वर्षभर समाजहिताचे १२४ उपक्रम राबवले. पर्यावरण संरक्षण, आरोग्य जनजागृती आणि समुदाय विकासावर भर देण्यात आला. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, स्वसंरक्षण प्रशिक्षण आणि रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन झाले. विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला.

successful outcomes and social impact of nss initiatives at saraswati college

खारघर येथील सरस्वती कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने सुरू केलेल्या उपक्रमांची सांगता नुकतीच महाविद्यालयात झाली. यावेळी विविध विद्यार्थ्यांचा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.

प्राचार्या डॉ. मंजुषा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तसेच एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सुनितल पाल आणि प्रा. संजय सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांनी वर्षभर समाजहिताचे एकूण १२४ उपक्रम यशस्वीपणे पार पाडले. स्वयंसेवकांनी उत्साह, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून विविध कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला. यामुळे महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.

वर्षभर पर्यावरण संरक्षण, आरोग्य जनजागृती आणि समुदाय विकास या विषयांवर विशेष भर देण्यात आला. स्वच्छता अभियान, वृक्षारोपण मोहीम तसेच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित जनजागृती कार्यक्रमांमधून नागरिकांना स्वच्छता आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यात आला. आरोग्यविषयक उपक्रमांतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरे, स्टेम सेल दान जनजागृती मोही, रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे प्राचार्यांकडून विशेष कौतुक करण्यात आले.