नाशिकरोड येथे रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) सतर्कता मोहिमेतंर्गत अयोध्या-मुंबई अमृतभारत एक्स्प्रेसमधून जळगाव ते कल्याण प्रवास करणाऱ्या तरुणाकडून एक कोटी ४८ लाख ६४ हजाराची रोकड जप्त केली. रकमेबाबत समाधानकारक कागदपत्रे न दिल्याने ‘आरपीएफ’ने त्याला रकमेसह आयकर विभागाच्या ताब्यात दिले.
संदीप बाळासाहेब भामरे (२४, रा. गोमवाडी, जि. सांगली, सध्या रा. भवानी पेठ, जळगाव) या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भामरे हा कुरियर बॉयसारखे काम करत असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. ही रक्कम कोणी दिली, कोठे पोहोचवायची होती याचा आयकर विभाग शोध घेत आहे. सविस्तर वृत्त...३