अमेरिकेत अमली पदार्थ आणि नशेच्या औषधांचा अवैध पुरवठा करण्यात सामील एका आंतरराष्ट्रीय तस्करी जाळ्याविरोधात अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एनसीबी) आणि अमेरिकेचे अमली पदार्थ अंमलबजावणी प्रशासन (डीईए) यांनी भारतात संयुक्त कारवाई केली. यामध्ये सहा जणांना अटक करण्यात आली.
‘ऑपरेशन मान्सून थंडर’ या नावाखाली ही कारवाई करण्यात आली. एनसीबीने ४ ते १३ नोव्हेंबरदरम्यान हैदराबाद, दिल्ली, कोलकाता आणि लखनऊमधील विविध ठिकाणांवर छापे टाकले. यामध्ये एका महिलेसह सहा जणांना अटक करण्यात आली, असे सांगण्यात आले. हे जाळे संपूर्ण अमेरिकेत अमली पदार्थ आणि नशेच्या औषधांचा पुरवठा करत होते. जून २०२२ ते नोव्हेंबर २०२६ या काळात आरोपींद्वारे अमेरिकेत सुमारे तीन हजार पार्सल पाठवण्यात आली.नवी दिल्ली/लखनऊ : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित गँगस्टर नसीम दुर्रानी शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे दिल्ली पोलिस आणि नोएडा एसटीएफच्या संयुक्त पथकासोबत झालेल्या चकमकीत मारला गेला, अशी माहिती सूत्रांनी दिली. नसीम मोठ्या गुन्ह्याच्या उद्देशाने सिकंदराबाद येथे आल्याची माहिती गुरुवारी रात्री ‘एसटीएफ’च्या नोएडा शाखा आणि दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेला माहिती मिळाली. यानुसार संयुक्तपणे कारवाई करण्यात आली.