चेन्नई : तमिळनाडूमधील तिरुपरनकुंद्रम टेकडीवर कार्तिकी पौर्णिमेला म्हणजेच, २४ नोव्हेंबरला ‘कार्तिगई दीपम’ (दिवे) प्रज्वलित करण्यास एक वेळ सवलत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय स्थगित केला. मद्रास उच्च न्यायालयाने या टेकडीवर पारंपरिक ‘कार्तिगई दीपम’ प्रज्वलित करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, दर्ग्याजवळील दगडी स्तंभावर (दीपाथून) ‘कार्तिगई दीपम’ प्रज्वलित करण्यास परवानगी दिल्यास, देशातील हजारो सर्व्हे स्तंभांना धार्मिक स्वरूप प्राप्त होऊ शकते, असा युक्तिवाद तमिळनाडू सरकारने बुधवारी युक्तिवाद केला होता. तिरुपरनकुंद्रम टेकडीवर हा दिवा नेमका कुठे आणि कोणाद्वारे प्रज्वलित केला जावा, हा मदुराई येथील अरुलमिगु सुब्रमण्यस्वामी मंदिराशी संबंधित ‘कार्तिगई दीपम’ वादाचा मुख्य मुद्दा आहे.